राज्य लॉन टेनिसचे अजिंक्यपद स्पर्शने पटकावले

राज्य लॉन टेनिसचे अजिंक्यपद स्पर्शने पटकावले


पनवेल/प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय लॉनटेनिस अजिंक्यपद स्पर्धा दि.२६ व २७ नोव्हेंबर रोजी पार पडल्या.सदरच्या स्पर्धेत पनवेल तालुक्यातील  kolhi कोपर गावातील रहिवासी व सध्या नवीन पनवेल येथे वास्तव्य असलेला कुमार स्पर्श संतोष पाटील याने अजिंक्य पद पटकावले आहे.सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने यजमान नाशिक जिल्ह्यातील कुमार अर्चन पाठक याचा सरळ सेटमध्ये ४-२ व ४-१ असा पराभव केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.पुष्कर लेले तसेच इतर उपस्थित पाहुण्यांनी स्पर्शचे अभिनंदन केले.स्पर्शच्या यशात त्याचे वडील संतोष पाटील व आई सौ.पल्लवी पाटील तसेच बहिण कुमारी तन्वी पाटील  व प्रशिक्षक अरूण भोसले NMSA ASA अकॅडमी मोठा वाटा असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.स्पर्शच्या यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक त्याचे आजोबा साईमार्ट,पेझारी चे मालक विलास म्हात्रे, रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच सर्व नातेवाईक व  (कोल्ही)कोपर ग्रामस्थांनी केले आहे.