*केंद्र शासन क्रीडा विभागाचे सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर..*
आलिबाग(प्रतिनिधी)- रायगड जिल्ह्यातील सुमा सिद्धार्थ शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर...
"पॅरा शूटिंग" या खेळ प्रकारात क्रीडा मार्गदर्शन केले असल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्यामुळे उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर...
पुरस्कार वितरण दि.30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे प्रदान करण्यात येणार आहे...
सुमा शिरूर यांचे रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी अभिनंदन केले आहे..