“मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023” अंतर्गत वरसोली ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा संपन्न

“मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023” अंतर्गत वरसोली ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा संपन्न


अलिबाग, दि.10 (जिमाका):-* मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आदेशानुसार “मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023” अंतर्गत आज अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायत येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली.

      जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कल्याणकर यांनी उपस्थित मतदारांना दि.9 नोव्हेंबर 2022 पासून सुरु झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. वरसोली ग्रामपंचातीमधील मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणी किती मतदारांची झाली याचा त्यांनी आढावा घेतला. तसेच वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होणे तसेच मतदारयादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने अधिकाधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सूचित केले. या ग्रामसभेच्या निमित्ताने दि.9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीचे वाचनही करण्यात आले.

     यावेळी सरपंच प्रमिला भाटकर, उपसरपंच मिलिंद कवळे, सदस्य सुरेश घरत, सुजय घरत, नमिता माळवी, सजवणी कवळे, प्रियका गुंजाळ, नम्रता वर्तक, पूजा खोत, अनुराधा राणे, साधना राणे, दिलीप बना, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार मीनल दळवी, ग्रामविकास अधिकारी अनिल चवरकर, तलाठी दिलीप सानप, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे उपस्थित होते.



Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image