रविवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'

 रविवारी पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट' 


पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या 'दिवाळी पहाट' चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६ वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. 
               दरवर्षी संगीत रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. यंदा दिवाळी पहाटचे सहावे वर्ष असून या दिवाळी पहाट मध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे, तसेच सूर नवा ध्यास नवा स्पर्धक प्रणय पवार हे प्रसिद्ध गायक मंडळी सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत. तर या सोहळ्याचे निवेदन निवेदिका धनश्री दामले ह्या करणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून या प्रवेशिकेसाठी रोहित जगताप ८६९१९३०७०९, गौरव कांडपिळे ९९२०८६८००८ किंवा अभिषेक भोपी ९८२०७०२०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
पनवेल मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा मोठा उपक्रम : ४ हजाराहून अधिक महिलांना मिळणार शिलाई व घरघंटी मशीन
Image