शेल इंडियाच्या कामगारांना २३ हजार रुपयांची पगारवाढ
पनवेल(प्रतिनिधी) शेल इंडिया एम्प्लॉईज संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना ऐतिहासिक बोनस देणाऱ्या तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रा. लिमिटेड मधील कामगारांच्या पगारवाढीचा व सुविधा देण्याचा करार पार पडला. तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार कामगारांना २३ हजार रुपयांची भरघोस पगारवाढ करण्यात आली असून याचा ७० कामगारांना फायदा होणार आहे.