कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते “आकार” कार्यालयाचे उद्घाटन

 

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या शुभहस्ते “आकार” कार्यालयाचे उद्घाटन



       आर्किटेक्ट अनिकेत भिंगारदेवे यांचे उलवे नोड सेक्टर १७ मधील “आकार” या कार्यालयाचे उद्घाटन दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक रमेश शिंदे, उपसरपंच विजय घरत, उद्योगपती पप्पूशेठ घरत, युवक कॉंग्रेस अध्यक्ष रोहित घरत, युवा नेते कुणाल घरत, मयुरेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते.