जनसभा वृत्तपत्राच्या १२ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आ.प्रशांतजी ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न

 जनसभा वृत्तपत्राच्या १२ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आ.प्रशांतजी ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न



पनवेल (प्रतिनिधी)-जनसभा वृत्तपत्राच्या १२ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी रायगडचे अध्यक्ष आमदार सन्माननिय प्रशांतजी ठाकूर यांच्या शुभहस्ते पनवेल येथे एका शानदार समारंभात संपन्न झाले.

      जनसभा हे वृत्तपत्र गेल्या १२ वर्षांपासून पनवेल-रायगड,नवी मुंबई,ठाणे आणि मुंबई या विभागातील जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे.तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडी मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे.बदलत्या काळाबरोबर जनसभाने कात टाकत YouTube.com/c/

JansabhanewsLive हे ट्यूब चैनल आणि www.              Jansabha.page हे web portal सुरू करून दृक-श्राव्य आणि डीजिटल मिडीयामध्ये पदार्पण करून जनहिताचे आपले कार्य व्यापक आणि गतिमान केले आहे.

     अशा या सामाजिकदृष्टीकोन बाळगणाऱ्या वृत्तपत्राच्या प्रकाशनाप्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी संपादक-आप्पासाहेब मगर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या १२ वर्षाच्या कार्याचे कौतुक केले.त्याचबरोर जनसभाचा हा दिवाळी विशेषांक वाचनीय असून विविध सामाजिक,वैज्ञानिक विषयांबरोबर ललित लेख आणि कवितांसह साहित्याचा फराळ आपल्या वाचकांना देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगीतले.आणी सर्वांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा  दील्या.

      या प्रकाशन सोहळ्याला भाजपा प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी सय्यद अकबर,भाजपा रायगड जिल्हा युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस समीरजी कदम,प्रविण मोहोकर,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ,महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर,वरिष्ठ पत्रकार संजय कदम,रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे,नवलोकहित दृष्टीचे संपादक संदेश सोनमळे,सदैव जागृतचे मयूर बर्वे,रायगड संदेशचे संपादक विशाल सावंत,आदिवासी सम्राट या साप्ताहिकाचे संपादक गणपत वारगाडा,दिलीप शिर्के,किरण बाथम,अभिषेक बसवेकर,रवि पाटील,सनिप कलोते तसेच अनेक मान्यवर पत्रकार मित्र,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image