परिणीता सोशल फाऊंडेशनचा पहिला दिवाळी अंक आज प्रकाशित

परिणीता सोशल फाऊंडेशनचा पहिला दिवाळी अंक आज प्रकाशित


मुबंई (प्रतिनिधी) - परिणीता सोशल फाऊंडेशनचा पहिला दिवाळी अंक आज प्रकाशित झाला आहे. अवघ्या मुबंईकरांचे आराध्य असलेल्या श्री सिद्धिविनायका चरणी परिणीता दिवाळी अंकाची प्रत अर्पण करून परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका साक्षी प्रशांत सागवेकर यांनी हे प्रकाशन केले. यावेळी त्यांच्यासोबत परिणीता सोशल फाऊंडेशनचे मार्गदर्शक तथा परिणीता दिवाळी अंकाचे संपादक प्रशांत सागवेकर, व्यवस्थापक वेदांग सागवेकर, प्रशांत सागवेकर यांच्या भगिनी वर्षा मिरकर उपस्थित होत्या. या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर ख्यातनाम सिने अभिनेत्री तथा मराठी बीग बॉस विजेती मेघा धाडे हीचा पारंपरिक वेशभुषेतील फोटो झळकला आहे.

परिणीताच्या पहिल्याच दिवाळी अंकामध्ये अमरावतीच्या विशाल मोहोड यांची वृद्धाश्रम ही कथा, डोंबिवलीच्या सुनिता तांबे यांची कन्यादान ही कथा, मुबंईच्या भक्ती कुमठेकर यांची प्रेम ही कविता, अकोल्याच्या स.पुं.अढाऊकर यांची खारं बिस्कुट ही वऱ्हाडी बोली कथा, औरंगाबादच्या अपर्णा देशपांडे यांची आई ही कथा, नागपूरच्या जयश्री दाणी यांची इशा ही कथा, पुण्याच्या सुप्रसिद्ध ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ.प्रांजली गाडगीळ यांची स्तनांचा कर्करोग या विषयावरची विशेष मुलाखत, परभणीच्या भानुदास धोत्रे यांची बहिणाई ही कविता, बुलडाण्याच्या किरण डोंगरदिवे यांचा गदिमा आणि स्री रुपं हा लेख, तुळजापुरच्या सुरज अंगुले यांचा मंगळसुत्र हा लेख, सी.एस.पाटील यांची विच्छा माझी पुरी करा हा लेख, पुण्याच्या सतिश हब्बू यांच्या चारोळ्या आणि वटपौर्णिमा ही कविता, भाग्यश्री परिणीता विजय ईनामदार यांचा परिणीता उद्योग सखी हा लेख, कांदिवली मुंबईच्या अश्विनी परांजपे रानडे यांचा आधुनिक सावित्री हा लेख, वनिता प्रदीप धनवटे बोरकर यांचा बायका श्रीमंत असतात हा लेख, डॉ. अस्मिता हवालदार यांचा अधुरी एक कहाणी हा लेख, जकार्ता इंडोनेशिया येथील ज्योती जोशी यांचा सुसंवादाच्या वाटा हा लेख, मुंबईच्या सुरुची वीरकर यांची स्री आणि पुष्पा कुलकर्णी यांची स्त्री रुपे या कविता, सुरेखा काळवीट अग्निहोत्री यांची दर्शन ही कथा, मुंबईच्या सारिका कुलकर्णी यांची अंतरबंध ही कथा आणि नाशिकच्या गिरिश कुलकर्णी यांची तीची गोष्ट ही दिर्घ कथा, मुग्धा नाडकर्णी यांची मैत्रिण म्हणजे ही कविता, राधा‌ प्रमोद गावडे यांची रंग माझा वेगळा ही कविता अशा साहित्याची निवड करण्यात आली असून हे साहित्य या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या दिवाळी अंकासाठी केंद्रीय मंत्री मा.नारायण राणे साहेब, राज्याचे उद्योग मंत्री मा. उदय सामंत साहेब, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते आणि उद्योजक मा.परेश ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि उद्योजक मा.प्रितम म्हात्रे, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक मा.रामजी बेरा, अमेरिका स्थित टीसा या आय टी कंपनीचे संचालक आणि परिणीता सोशल फाऊंडेशनचे सह संचालक मा.सुशिलकुमार अंभोरे, डोबिवली येथील स्वादबंध या उत्पादनाच्या संचालिका अमृता जोशी, खारघर येथील फायनान्सशीयल अडव्हायजर संगिता सोनवणे, ज्योतिष वास्तूतज्ज्ञ आणि रत्नपारखी मा. अरुण सांडगे आणि मा.अमित सांडगे अशा दानशूर आणि समाजसेवी वरिष्ठांचे सहकार्य लाभले.‌

ज्यांना हा अंक हवा असेल त्यांनी परिणिता सोशल फाऊंडेशनच्या +91 9619949843 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका साक्षी प्रशांत सागवेकर यांनी केले आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image