विजयादशमी निमित्त संघाचे पनवेलमध्ये दिमाखदार संचलन

 विजयादशमी निमित्त संघाचे पनवेलमध्ये दिमाखदार संचलन


पनवेल(प्रतिनिधी) विजयादशमी निमित्त सीमोल्लंघन करण्याची हिंदु धर्मात परंपरा आहे. ह्या परंपरेला अनुसरून दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे पथसंचलन केले जाते. त्या अनुषंगाने पनवेलमध्ये संघाचे दिमाखदार संचलन झाले. 

      १९२५ साली दसऱ्याच्याच दिवशी संघाची स्थापना झाली होती, त्यामुळे संघामध्ये दसऱ्याच्या पथसंचलनाला विशेष महत्त्व असते. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे पथसंचलन झाले नाही, त्यामुळे यावर्षी संघ स्वयंसेवकांमध्ये वेगळाच उत्साह होता, अतिशय शिस्तबद्ध व दिमाखदार असे संचलन पनवेलकरांना अनुभवायला मिळाले. हे संचलन रचना व प्रार्थना करून शहर पोलिस स्टेशन पासून सुरू झाले. घोष (बँड) पथक, ध्वज दंडासह करंजाडे पासून ठाणानाका एवढ्या भागातील गणवेशातील शंभरहुन अधिक स्वयंसेवकांचे हे संचलन एचओसी कॉलनी, कफ नगर, सावरकर पुतळा अशा मार्गाने झाले. मार्गक्रमण करताना ठिकठिकाणी ध्वजासह स्वयंसेवकांवर नागिरकांनी पुष्पवृष्टी केली. संचलनाची सांगता शहरातील चिंतामणी हॉल येथे  झाली. हॉलमध्ये शस्त्रपूजन, प्रात्यक्षिके व्याख्यान असा कार्यक्रम झाला.  यावेळी स्वयंसेवकांकडून शाखाशहा आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली गेली. उत्सवाला वक्ते म्हणून संघाच्या कोकण प्रांताच्या महाविद्यालयीन विभागाचे प्रमुख सुहास पोतदार उपस्थित होते, त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त पोलिस अधिकारी तथा आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक हनुमंतराव शिंदे हे उपस्थित होते.
Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image