सतरा वर्षीय तरुणाची हत्या, गुन्हा दाखल

 सतरा वर्षीय तरुणाची हत्यागुन्हा दाखल

नवीन पनवेल : सतरा वर्षीय तरुणाची हत्या केल्या प्रकरणी रवींद्र उर्फ हरियाणी व राज यांच्याविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         

         रवींद्र उर्फ हरीयाणी व राज हे सलमान नसीम खान यांच्या सेक्टर 14, कामोठे येथील पान शॉप च्या दुकानावर पान खाण्यासाठी येतात. त्यांची एका सोबत भांडण झाले होते व ते दोघे मिळून त्याला लाथाबुक्क्याने व हाताने मारहाण करत होते. यावेळी भांडण सोडवण्याकरता सलमान गेला असता राज यांनी त्याच्याजवळ असलेला चाकू त्या इसमाच्या पाठीमागे भोसकला. व तो इसम खाली जमिनीवर पडला. त्यानंतर रवींद्र उर्फ हरियाणी व राज हे दोघेही तेथून पळून गेले. विशाल राजकुमार मौर्य याला हाताबुक्याने व लाथेने मारहाण करून राज याने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने विशालच्या पाठीमध्ये भोसकून त्याची हत्या केली. त्याला एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे घेऊन गेले असता डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दोघां विरोधात कामोठे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image