औद्योगिक क्रांती 4.0 : रोबोटिक्स विज्ञान – तंत्रज्ञानाशी कृतीतून जोडणार विद्यार्थी
पनवेल : दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची होत असलेली प्रगती लक्षात घेता रायगड जिल्ह्यातील मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान अनुभवता यावे यासाठी शाहू इन्स्टिट्यूट, पनवेल व चिल्ड्रेन टेक सेंटर, ठाणे यांच्या वतीने चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अंड सायन्स महाविद्यालयात महत्वपूर्ण रोबोटिक प्रशिक्षण सेमिनार आयोजित करण्यात आला. चिल्ड्रेन टेक सेंटरचे संचालक श्री. पुरुषोत्तम पाचपांडे यांनी इंटरनेट ऑफ थिंग्स, मशीन लर्निंग, थ्रीडी प्रिंटींग, रोबोटिक्स, स्मार्ट उपकरणे या प्रकारची माहिती दिली.
तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रगती होत असताना प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर केला जातो. तंत्रज्ञान सोयीचे असले तरी त्याचे प्रशिक्षण नव्या पिढीने शिक्षण तसेच करिअरच्या अनेक नव्या वाटा शोधल्या पाहिजे. असे मत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले.
प्रशिक्षणाची शहराला गरज असून पालकांनी आपल्या पाल्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाचा उपयोग करून घेतल्यास आजचा लहानगा भविष्यातील मोठा शास्त्रज्ञ बनू शकतो. असा विश्वास श्री. जयंत भगत यांनी व्यक्त केला. सदर सेमिनारमध्ये चिल्ड्रेन टेक सेंटरचे संचालक श्री. पुरुषोत्तम पाचपांडे यांनी मार्गदर्शन केले व मेधा गाडगीळ यांनी आभार व्यक्त केले. यावेळी जनार्दन भगत संस्थेचे अध्यक्ष अरुनशेठ भगत, महानगरपालिका उपायुक्त सचिन पवार, माजी नगरसेवक अनिल भगत, व ४० तंत्रज्ञान एज्युकेशन क्षेत्रातील संस्थेचे मान्यवर उपस्थित होते.