एडीएचएस मुंबईकडून नवी मुंबईतील 100 हून अधिक गृहनिर्माण संस्थांना डिजिटल आयईसी डिस्प्ले बोर्ड वाटप
सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी हार्ट फाऊंडेशन आणि मेडिकव्हरच्या मदतीने अनोखा उपक्रम
नवी मुंबई: मलेरिया आणि डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी, एडीएचएस मुंबई, हार्ट फाउंडेशन आणि मेडिकोव्हर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई आणि पनवेलमधील 100 सोसायट्यांना विविध आरोग्य समस्या, आजारांची लक्षणे, घ्यावयाची खबरदारी आदींविषयी माहिती सादर करण्यासाठी डिजिटल हेल्थ बोर्ड वितरित करून एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
अशी सामान्य जागरूकता वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हा संयुक्त उपक्रम सहाय्यक संचालक आरोग्य सेवा एनव्हीबीडीसीपी मुंबईचे डॉ. बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला असून त्यांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रभाग अधिकारी (खारघर) श्री जितेंद्र मढवी आणि डॉ. जयकर एलिस, संस्थापक अध्यक्ष हार्ट फाउंडेशन आणि आयईसी समन्वयक तसेच एडीएचएसएनव्हीबीडीसीपी सार्वजनिक आरोग्य विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्राचे आणि हार्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन गडकरी मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख(नवी मुंबई )आणि श्री. अभय जाधव, रिजनल मार्केटींग हेड उपस्थित होते.
आजच्या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट काही सेकंदात व्हायरल होऊ शकते. त्यामुळे ऑनलाइन काहीही शेअर करताना किंवा पोस्ट करताना सावध राहण्याबाबत याठिकाणी जागरुक करण्यात आले. एखाद्याने वैद्यकीय माहितीशी संबंधित खरी आणि अधिकृत माहिती फॉरवर्ड करावी आणि म्हणून एडीएचएस एनव्हीबीडीसीपी , शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग, पनवेल महानगरपालिका, हार्ट फाउंडेशन आणि मेडिकव्हर हॉस्पिटलने सार्वजनिक आरोग्यासाठी एक उत्तम पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील 100 हून अधिक सोसायट्यांना आरोग्यविषयक समस्या आणि त्याबाबतच्या खबरदारीची माहिती देणारे आईसी डिजीटल हेल्थ बोर्ड दिले जाणार असल्याची माहिती डॉ. जयकर एलिस यांनी दिली.
यावेळी बोलताना डॉ. बाळासाहेब सोनवणे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा एनव्हीबीडीसीपी सांगतात की, सरकारने नेहमीच डेंग्यू, मलेरिया आणि इतर जलजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी खूप पुढाकार घेतला आहे प्रतिबंधात्मक खबरदारीचे उपाय केल्यास हे जीवघेणे आजार टाळता येऊ शकतात. 2030 पर्यंत मलेरियामुक्त देश बनवण्याच्या सरकारच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हार्ट फाउंडेशन आणि मेडिकव्हर हॉस्पिटल नवी मुंबईने एकत्र येत यामध्ये मोलाचा सहभाग घेतला आहे. सार्वजनिक आणि समाजाच्या सहभागाशिवाय कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून, मी तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे आणि एकत्रितपणे आम्ही निश्चितपणे लक्ष्य साध्य करू.
यावेळी बोलताना, डॉ. सचिन गडकरी, केंद्र प्रमुख, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई सांगतात की, मेडिकव्हर हॉस्पिटल्सना या सीएसआर उपक्रमाचा एक भाग होण्याचा विशेषाधिकार आहे. जागरूकतेच्या अभावामुळे अनेकांना अशा आजारांना बळी पडावे लागते. या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करत आम्हाला खरोखरच लोकांच्या आरोग्याच्या प्रतिबंधात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्ही ते करत आहोत, म्हणून आम्ही याचा एक भाग बनल्याबद्दल आभारी आहोत.
विविध शासकीय उपक्रमांमुळे डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रण करणे शक्य होत आहे. परंतु पावसाळ्यात आता ही प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहेत. हा रोग अधिक गंभीर आहे कारण तो कोणत्याही आणि प्रत्येक वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. जरी ते व्हायरल इन्फेक्शन असले तरी, वेळेत उपचार न केल्यास ते अनेक गुंतागुंत देखील विकसित करू शकतात. म्हणून, कोणताही ताप आकस्मिकपणे घेऊ नये. उशिरा निदान झालेल्या कोणत्याही आजारावर उपचार करताना अधिक गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे आपण सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. खारघर येथील मेडिकोव्हर हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा आहेत आणि अशा आजारावत मात करण्यासाठी आम्ही सर्वच विविध उपक्रमातून जनजागृती करत असल्याची प्रतिक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ निखिल वर्गे यांनी व्यक्त केली.