खारघरमधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात न आल्यास आंदाेलनाचा इशारा भाजपा शिष्टमंडळाने सिडकोला दिला

खारघरमधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात न आल्यास आंदाेलनाचा इशारा भाजपा शिष्टमंडळाने सिडकोला दिला 


खारघर (प्रतिनिधी) दि.२०-जर आपण खारघर शहरातील रस्त्यांवरून फेरफटका मारल्यास आपल्यालाही ध्यानात येईल की असा एकही रस्ता नाही की त्याच्यावर खड्डे नाहीत.प्रत्येक रस्त्याची चाळण झालेली आहे.प्रचंड प्रमाणात त्रास सहन करत खारघरवासीयांना अशा खड्ड्यांतील रस्त्यावरून आपली वाहने हाकत असतात.

             अगदी दोन ते तीन वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यांवरही आज वेगळे दृश्य दिसत नाही.एक महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टी खारघर मंडळातर्फे कार्यकारी अभियंता खारघर, मुख्य अभियंता सिडको व व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले होते.वर्षभराची AMC असणार्‍या ठेकेदारातर्फे काही रस्त्यांची जुजबी डागडुजी करण्यात आली.पण पावसाचे कारण पुढे करून अनेक रस्त्यांवर कामें न झाल्याने रस्त्यांवरील खड्डे अधिक खोल आणि अधिक मोठे झाले आहेत.सिडको पाणीपुरवठा विभाग, महानगर गॅस,ऑप्टिक फायबर सेवा पुरविणाऱ्या कंपन्या यांनी खोदलेल्या चरांच्या खड्ड्यात अडकून अनेक अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाल्याच्या घटना घडत आहेत.
         सिडकोने गेल्या महिन्याभरात काय केले ज्याचा आढावा घेण्यासाठी तसेच खड्डे का बुजवले जात नाहीत याचा जाब विचारण्यासाठी काल भाजपा खारघर तळोजा मंडळाचे पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री गिरीश रघुवंशी यांची भेट घेऊन त्यांना परत एक निवेदन दिले.सतत पडणारा पाऊस याचे कारण पुढे करून श्री.गिरीश रघुवंशी साहेब म्हणाले की,पावसाचा जोर कमी होताच संयुक्त सर्वेक्षण करून सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन देवू.
       पुढील काही दिवसांत अभियंत्यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये खड्डे बुजवण्यात न आल्यास आंदाेलनाचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.यावेळी भाजपा खारघर मंडलाचे अध्यक्ष श्री.ब्रिजेश पटेल,उपाध्यक्ष श्री.दिलिप जाधव,सरचिटणिस श्री.दिपक शिंदे,जिल्हा सचिव साै.गिता चाैधरी,महिला मोर्चा सरचिटणिस साै.साधना पवार,मा.नगरसेवक श्री.निलेश बाविस्कर,श्री.रामजी बेरा,मा.नगरसेविका साै.नेत्रा पाटिल आदि उपस्थित होते.