महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर


नवी मुंबई (प्रतिनिधी)दि.२६-  महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या वतीने आज बेलापूर, नवी मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे पत्रकार परिषदेत असोसिएशनची यंदा नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आलेली असून श्री. आनंद विलासराव पाटील यांची अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यासंदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्याचप्रमाणे महासचिव म्हणून श्री. हितेश सावंत आणि खजिनदार म्हणून श्री. महेश माटे यांची निवड करण्यात आली. श्री.आनंद पाटील यांनी मावळते अध्यक्ष श्री.संतोष आंबवणे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी असोसिएशन ची पुढची वाटचाल कशी असेल याबतीत सांगितले.

       यावेळी ज्येष्ठ सदस्य श्री.संग्राम पाटील, श्री.के. के. म्हात्रे,श्री. मधू पाटील तसेच मावळते महासचिव श्री. बाबासाहेब भोसले आणि खजिनदार श्री. लक्ष्मण साळुंखे तसेच मीडिया प्रमुख श्री राजेन्द्र कोलकर तसेच श्री.प्रवीण शेट्ये, श्री.अजित येलमार, श्री.आशिष कवडे,श्री. सुनील ठोंबरे,श्री.उत्तम येलमार, श्री.संजय इंगळे आणि पवन देवलकरआदी सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image