शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद-समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण

शिक्षकदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद-समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण


मुंबई, दि. ४: - शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. ५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे वर्षा शासकीय निवासस्थानातून दुपारी १ वाजेपासून दृकश्राव्य प्रणालीद्वारे राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकटानंतर अलिकडेच शैक्षणिक वर्षाला नियमितपणे सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्याचे जाहीर केले आहे. या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध मुद्दे आणि नवी दिशा यांचा या संवादादरम्यान उहापोह होणे अपेक्षित आहे. या संवादाचे मुख्यमंत्री सचिवालयाच्या समाज माध्यमांवरून थेट प्रसारण करण्यात येणार आहे.


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image