'सेवा पंधरवडा' निमित्त रविवारी खांदा कॉलनीत रक्तदान शिबीर

 'सेवा पंधरवडा' निमित्त रविवारी खांदा कॉलनीत रक्तदान शिबीर 



पनवेल(प्रतिनिधी)  देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या 'सेवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय युवा मोर्चा पनवेलच्यावतीने रविवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी खांदा कॉलनी मधील रोटरी ब्लड बँक येथे सकाळी ०९ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 
अधिक माहितीसाठी अभिषेक भोपी- ८३६९६५४९४९, गौरव कांडपिले- ९९२०८६८००८, आनंद ढवळे- ९७७३९४७७७७ किंवा विश्वजित पाटील- ८१०८९९३४३९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.