आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश; ०२ कोटी ४८ लाख रुपयांच्या कामाची बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश; ०२ कोटी ४८ लाख रुपयांच्या कामाची बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध 


पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपुल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने ०२ कोटी ४८ लाख रुपयांच्या कामाची बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध केली आहे. 

         नवीन पनवेल माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. या उड्डाण पुलाची पावसामुळे दुरावस्था झाली होती. या खड्ड्यामुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी झाले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या पूलावरील रहदारीचा विचार करता पूलाच्या उतारावरील दोन्ही बाजूला सिमेंट कॉकेटीकरण होणे गरजेचे असताना सिडको त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा उड्डाण पूल खड्डे मुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी भर पावसामध्ये पूलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.  भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिरीरीने सहभाग घेत पावसात भिजत रस्ता अडवल्यावर सिडकोचे बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंत्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भेटून आम्ही दोन महिन्यात टेंडर प्रोसेस सुरू करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या सांगत होते. पण त्याला नकार देऊन सर्वांनी पावसात रस्त्यावर ठाण मांडले तर काहीजण रस्त्यावर झोपले. शेवटी सिडको प्रशासन या आंदोलनापुढे नमले असून सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी येत्या रविवार पर्यत या उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यात येतील तसेच आठवड्याभरात या पुलाच्या चारी बाजूंचे कॉकिटीकरण करण्याची निवीदा काढण्यात येईल असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांना फोन करून दिले. त्यानंतरच भरपावसामध्ये सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र जर येत्या आठवड्या भरात हे काम झाले नाही तर आमच्यासाठी आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे असा इशारा आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी झालेल्या रस्तारोको आंदोलनावेळी सिडको प्रशासनाला दिला होता. त्या अनुषंगाने सिडकोने न्यू पनवेल आरओबी येथे डेक स्लॅबच्या रिसरफेसिंगसह जोडरस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे या शीर्षकाखाली ०२ कोटी ४८ लाख ६९ हजार ८३९ रुपयांचे काम करण्यात येणार असून बोली मागवणारी सूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहेत. 

कोट-
 खड्डे अपघातांना आमंत्रण होते. त्यामुळे या संदर्भात आंदोलनाची भूमिका आम्ही घेतली.  नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आम्ही कधीही मागे पडत नाही. त्यामुळे भर पावसात आंदोलन करताना आम्ही कदापिही माघार घेतली नाही. शेवट्पर्यंत सिडकोचे अधिकारी योग्य कार्यवाहीची भूमिका घेत नाही तो पर्यंत आंदोलन करीतच राहिलो. त्या अनुषंगाने या आंदोलनाला यश आले त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सिडकोचे आभार मानतो. - संदीप पाटील,उपाध्यक्ष भाजप, पनवेल शहर 
Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image