कळंबोली लोखंडबाजार चौकातील खड्यात अडकली रिक्षा

कळंबोली लोखंडबाजार चौकातील खड्यात अडकली रिक्षा


पनवेल/जितीन शेट्टी:-कळंबोली वसाहत आणि लोखंड बाजार चौकातील भल्या मोठ्या खड्यात रविवारी दुपारी तीन आसनी रिक्षाचे पुढचे चाक रुतले. खड्यात साचलेल्या पाण्यामुळे रिक्षाचालकासह प्रवाशांना अथक परिश्रम केल्यानंतर रिक्षा खड्यातून बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे लोखंड बाजारात प्रवेश करण्यासाठीच्या मुख्य चौकात पावसाळी पाणी साचत असल्याने वाहनचालकांना येथून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते.वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही येथील पाणी साचण्याची समस्या दूर झालेली नाही. संबंधित रस्ते आणि उड्डाण पुलाच्या बांधणा-या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी प्रशासनाने पावसाळी पाणी साचण्याची समस्या ध्यानात न घेता येथे पावसाळी पाण्याच्या निच-यासाठी नियोजन केले नाही. पनवेल पालिकेने येथे साचलेले पाणी काढण्यासाठी मोटार पंप लावलेला आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image