नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी दि.20 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी दि.20 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


अलिबाग,दि.18(जिमाका):-* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने “नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” मंगळवार, दि.20 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, मुंबई-पुणे महामार्ग, गांधी हॉस्पिटलसमोर, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे आयोजित केला आहे.

     जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 467 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, फार्मासिस्ट इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

     रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा. तसेच या विनामूल्य रोजगार मेळाव्यास नोकरी इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती अ. मु.पवार यांनी केले आहे. 



Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image