पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होतअसल्याने सकाळ,संध्याकाळ बस फेऱ्या वाढवण्याची कामोठे कॉलनी फोरमची एन एम एमटीकडे मागणी

पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी होतअसल्याने सकाळ,संध्याकाळ बस फेऱ्या वाढवण्याची कामोठे कॉलनी फोरमची एन एम एमटीकडे मागणी


कामोठे (प्रतिनिधी)- खांदेश्वर आणि मानसरोवर हे एन एम एम टी बस सेवा अपुरी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने रेल्वे स्थानकावर येतात आणि वाहतूक कोंडी होते. या सर्व पार्श्वभूमीवर येथे येणाऱ्या बसच्या फेऱ्या सकाळ-संध्याकाळ वाढवण्यात याव्यात अशी मागणी कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने नवी मुंबई परिवहन मंडळाकडे करण्यात आली आहे. याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन एन एम एम टी च्या अधीक्षकांनी दिले

कामोठे परिसरामध्ये खांदेश्वर आणि मानसरोवर हे दोन रेल्वे स्थानक आहेत. या ठिकाणी कामोठे वसाहत, कळंबोली, नावडे, तळोजा, खांदा वसाहत आणि नवीन पनवेल येथून चाकरमानी आणि व्यवसायिक लोकल ट्रेन पकडण्यासाठी येतात. प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नवी मुंबई परिवहन विभागाने खांदेश्वर ते नवीन पनवेल आणि रोडपाली ते मानसरोवर यादरम्यान बस सेवा सुरू केली. स्वस्त प्रवास असल्याने या बसेसना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत होता. मध्यंतरी कोरोनामुळे लोकल सेवा बंद असल्याने एन एम टी बस सेवा बंद झाली होती. मात्र आता पुन्हा या मार्गावर बसेस सुरू करण्यात आले आहेत. मात्र त्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत दोन्ही रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोकळ्या जागेवर इमारतींची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथे चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा शिल्लक नाही. वाहनतळाचा  प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसेसची संख्या कमी असल्याने सहाजिकच प्रवासी आपले खाजगी वाहने रेल्वेस्थानकावर घेऊन येतात आणि रस्त्यावर पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुक पोलिसांच्या कारवाई ला सामोरे जात नाहक भूर्दँड भरावा लागत असुन वाहतूक कोंडीच्या  त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  रस्त्यावरच सिडकोने पे अँड पार्क सुरू केल्यान त्याला कामोठे कॉलनी फोरमने विरोध दर्शवला आहे. त्याच बरोबर जर सकाळी आणि संध्याकाळी बसच्या फेऱ्या वाढवल्या तर सहाजिकच खाजगी वाहनांची संख्या कमी होईल. त्यामुळे पार्किंग आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक जटिल बनणार नाही या उद्देशाने कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने नवी मुंबई परिवहन मंडळाचे अधीक्षक अनिल शिंदे यांना मंगळवारी निवेदन दिले. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच फेऱ्या वाढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्षा जयश्री झा, रंजना सडोलीकर, बापू साळुंखे, डॉ. सखाराम गारळे,  अरुण जाधव,राहुल आग्रे, राहुल बुधे अणि जयवंत खरात उपस्थित होते. 

*अंतर्गत बस सेवा सुरू करण्याची मागणी!*

कामोठे वसाहतीमध्ये या अगोदर मानसरोवर ते खांदेश्वर अशी बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक सेक्टरमध्ये थांबे केल्याने रहिवाशांना स्वस्तामध्ये अंतर्गत प्रवास करता येत होता. मात्र ही सेवा आता बंद असल्याने साहाजिकच  कामोठेकरांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर वसाहतीमध्ये अंतर्गत एन एम एम टी बस सेवा सुरू करण्याची मागणी कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातही लवकरच निर्णय घेऊ असे नवी मुंबई परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

*पनवेल महापालिकेकडे पाठपुरावा*

पनवेल महानगरपालिकेकडे स्वतःची परिवहन सेवा नाही. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून रहिवाशांना अंतर्गत प्रवास करण्यासाठी एन एम एम टीवर अवलंबून राहावे लागत आहे. जोपर्यंत पनवेल मनपाची स्वतःच्या मालकीची ही सेवा सुरू होत नाही. तोपर्यंत कामोठे वसाहतीत नवी मुंबई परिवहन विभागाकडून अंतर्गत बस सेवा सुरू करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पनवेल महापालिकेने नवी मुंबई महापालिका आयुक्त ह्यांच्याकडे  पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने करण्यात आली आहे.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image