सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने स्व.विनायक मेटे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली


सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने स्व.विनायक मेटे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली


पनवेल (प्रतिनिधी)-सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या वतीने स्व. विनायक मेटे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन दिनांक २१/०८/२०२२ रोजी सायंकाळी ७:०० वा जनसेवा आश्रम हॉल, खांदा कॉलनी या ठिकाणी केले होते.

        स्व.मेटे साहेबांना जड अंतःकरणाने मराठा समाज बांधवाकडून  श्रद्धांजली वाहण्यात आली. सदरच्या शोक सभेत स्व. मेटे साहेबांच्या मराठा समाजासाठी केलेल्या कार्याचा उजाळा देत श्री किशोर पाटील - अधीक्षक अभियंता नाशिक, श्री पवार साहेब निवृत्त DCP मुंबई , पनवेल महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका, खारघर फोरम च्या अध्यक्ष सौ.लीना अर्जुन गरड म्याडम, मराठा क्रांती मोर्चा रायगड जिल्हा समनवय्यक, माजी नगरसेवक श्री गणेश कडू, मराठा उद्योजक श्री रामदास शेवाळे साहेब, सकल मराठा समाज कळंबोली चे समनवय्यक श्री संदीप जाधव, पनवेल महानगरपालिका विद्युत अभियंता श्री बी आर कदम साहेब,श्री सुनील औटी, बीड जिल्हा रहिवाशी श्री गोपीनाथ मुंढे, श्री लालासाहेब लोंबटे, श्री उमेश वारदे, श्री बाळासाहेब खोसे , श्री संतोष जाधव आदी मान्यवरांनी शोक व्यक्त केला व अमर रहे !! अमर रहे !! मेटे साहेब अमर रहे च्या घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

      या प्रसंगी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी , शिवसंग्राम संघटना, बीड जिल्हा रहिवाशी खांदा कॉलनी येथील समाज बांधव उपस्तीत होते.


Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image