शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक


शिवसंग्रामचे संस्थापक,माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मुख्यमंत्र्यांना शोक




 

          मुंबईदि. 14:- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापकमाजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे  आहे. त्यांच्या निधनाने  मराठा आरक्षणासहसामाजिक चळवळीचा बुलंद आवाजधडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी  विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

          मुख्यमंत्री  शोकसंदेशात म्हणतात,मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. या बैठकीपुर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

          मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटूंबियांना  शासकीय  नोकरी मिळावीत्यांचं योग्य पुनर्वसन व्हावे तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरीशेतमजूरकष्टकरीकामगारगरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळोअशी ईश्वर चरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image