नागरी संरक्षण दल व ‘एमआयडीसी’च्यावतीने कामगारांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

 नागरी संरक्षण दल व ‘एमआयडीसी’च्यावतीने

कामगारांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण



 

       मुंबईदि. 10 : औद्योगिक क्षेत्रात घडणाऱ्या छोट्या - मोठ्या अपघातांना प्रतिबंध  बसावा यासाठी नागरी संरक्षण दल व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या संयुक्त विद्यमानाने औद्योगिक कामगारांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. ठाणे व बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील उद्योग क्षेत्रातील कामगार तसेच कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

          'राज्य मिशन २०२२ -२०२३अंतर्गत संचालक, नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण रबाळे अग्निशमन केंद्र येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे  ३ ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रशिक्षण पार पडले.

            देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षात औद्योगिक जडणघडणीमध्ये व प्रतिबंधक उपाययोजनाद्वारे प्रशिक्षीत कामगार वर्ग  तयार करण्याकरिता नागरी संरक्षण दलाच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. सामान्य नागरिकांबरोबरचसर्व उद्योगधंदे व कारखान्यामधील कामगार कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण  घेता यावे व सर्व कर्मचारी प्रशिक्षीत व्हावेत, याकरीता नागरी संरक्षण दल प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने आग प्रतिबंध व सुरक्षा उपाययोजनाप्रथमोपचार व सीपीआरविमोचन या विषयावर व्याख्याने व प्रात्यक्षिके पार पडली.

       "राज्य मिशन २०२२-२०२३ अंतर्गत नागरी संरक्षण विभागातर्फे सुरक्षा उपाययोजनाकरिता जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी नागरी संरक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Popular posts
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image