जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेला उरण मधून सुरूवात


जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेला उरण मधून सुरूवात



              अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने दिलेल्या निर्देशानुसार रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली आझादी गौरव पदयात्रेला दिनांक ९ ऑगस्ट रोजी जासई येथून सुरूवात करण्यात आली. जासई येथील हुतात्मा स्मारकास मानवंदना व स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांना अभिवादन करून जासई, चिर्ले, गावठाण, वेश्वी, दिघोडे, विंधणे, भोम ते चिरनेर येथे सन १९३० मधील हुतात्म्यांच्या स्मारकाजवळ या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जवळ जवळ २० ते २२ किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये महिला व तरुणांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या पदयात्रेचे नेतृत्व रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्री. महेंद्रशेठ घरत यांनी केले.

                  या पदयात्रेवेळी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी श्री. चंद्रकांत पाटील , श्री. राजाभाऊ ठाकूर, श्री. मिलिंद पाडगांवकर, सौ. श्रद्धा ठाकूर, श्री. विनोद म्हात्रे, डॉ. मनिष पाटील, श्री. अखलाक शिलोत्री, श्री. किरीट पाटील, श्री. मार्तंड नाखवा, श्री. संजय ठाकूर, श्री. महेंद्र ठाकूर, सौ. रेखा घरत यांच्या सह शेकडोंच्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईतील पहिल्या ट्रॉमा सेंटरला सुरूवात
Image
शंकर वायदंडे संपादित "रायगड सम्राट" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न
Image
मौजे साठरे बांबर बौध्द विकास मंडळ मुंबई तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या विद्यमाने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
Image
कायद्याबद्दल अज्ञान हाच गुन्हा!ज्येष्ठ अस्थितज्ञ डॉ. नितीन म्हात्रे यांचे प्रतिपादन
Image
शेकापचे राजेंद्र पाटील यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
Image