पनवेल-उरण मध्ये खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे कोर्सेस सुरू,"जे.एम .म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार"
पनवेल : पनवेल मध्ये प्रथमच एका छत्राखाली केंद्र सरकारचे विविध कोर्सेस ची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी वर्गाला जे.एम .म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने शिबिर आयोजित करून मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले होते. या शिबिरात युवक, महिला आणि तृतीय पंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले विविध प्रकारचे कोर्सेस संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी पनवेल ,खांदा कॉलनी, उरण , वेश्वी आणि खालापूर या ठिकाणी आपल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या पुढाकाराने पनवेल आणि उरण मधील नागरिकांसाठी सुरू केले आहेत.