युवाप्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ,खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिर संपन्न

युवाप्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ,खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिर संपन्न 



खारघर(प्रतिनिधी)-युवाप्रेरणा सामाजिक संस्था व माहेश्वरी प्रगती मंडळ ,खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी सलग बारावे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात ८१ रक्तदात्यांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला. तसेच परिसरातील नागरिकांसाठी साईदृष्टी ॲडव्हान्स सेंटर फॉर परफेक्ट व्हिजन-सानपाडा या हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर नेत्र चिकित्सा शिबिरात डॉक्टर राजपाल उसनाळे यांनी अनेक नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली व डोळ्या संबंधित आजारांबद्दल मार्गदर्शन केले. सदर शिबिराला भेट देण्यासाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे माननीय आयुक्त गणेश देशमुख साहेब यांच्या हस्ते रक्तदात्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब व आयुक्त गणेश देशमुख साहेब यांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या शिबिरास व सामाजिक कार्याबद्दल त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

      यावेळेस युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील,दिलीप जाधव, भरत कोंढाळकर,कुणाल देवकर, गोपाल राजपूत,संदीप ठाकरे,ललित बडोदेकर,आदित्य हाटगे,माहेश्वरी प्रगती मंडळ खारघरचे जय डागा,आशीष मनीयार,सतीशजी मुंदड़ा,मंगेशजी सिकची,अमित भांगड़े,सचिन सोनी,आशीष शारदा, डॉ राकेश सोमानी,गीतेष कोठारी, सोमन मालाणी यांसहअनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

      किरण पाटील हे गेल्या १५ वर्षांपासून खारघमध्ये "युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या"माध्यमांतून अनेक वेगवेगळे सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवून सामान्य जनतेची सेवा करीत असतात.त्यांच्या या कार्यामुळे ते संपूर्ण खारघमध्ये सुपरिचित झाले असून सर्व वयोगटातील खारघरवासी त्यांचे कौतुक करताना पहायला मीळतात.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image