प्रभू आळीच्या ओंकारेश्वर चे थाटामाटात आगमन;भव्य दिव्य तुंदीलतनू स्वरूपातील गणेश मूर्ती ठरत आहेत आकर्षण

प्रभू आळीच्या ओंकारेश्वर चे थाटामाटात आगमन;भव्य दिव्य तुंदीलतनू स्वरूपातील गणेश मूर्ती ठरत आहेत आकर्षण


पनवेल/प्रतिनिधी-येथील प्रभू आळी मधील ओंकारेश्वर चे आगमन रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात झाले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गणेशोत्सव साजरे करत असलेले ओंकार मित्र मंडळ हे पनवेलच्या मानाच्या गणेशोत्सव मित्र मंडळांपैकी अग्रगण्य समजले जाते. तुंदीलतनु स्वरूपातील गणेश मूर्ती मंडपात विराजमान झालेली असून ती साऱ्या गणेश भक्तांसाठी आकर्षण ठरणार आहे.

       अध्यक्ष सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 32 व्या वर्षी गणेशोत्सव साजरे करत असलेले हे मंडळ सामाजिक उपक्रमांकरिता देखील नावाजले जाते. अत्यंत प्रेक्षणीय आणि स्टेट ऑफ दि आर्ट जर्सी परिधान करून मंडळातील तमाम कार्यकर्ते आगमन सोहळ्यासाठी सहभागी झाले होते. भव्य दिव्य स्वरूपातील सिंहासनावर विराजमान झालेले गणरायांचे चतुर्भुज रूप स्तिमित करायला लावते. लाल रंगातील भरजरी उत्तरीय परिधान केलेले हे लोभस गणेश रूप पहायचे असेल तर प्रभू आळी मधील या गणेशोत्सव मंडळाला भेट दिलीच पाहिजे.

         भव्य दिव्य तूंदिलतनु गणेश मूर्ती ही कामोठे येथील श्री आर्ट चे मंदार राजम यांनी घडविली आहे. कामोठे येथून प्रस्थान करून पनवेल येथे आगमन झाल्यानंतर पनवेल एसटी स्थानकापासून प्रभू आळी पर्यंत गणरायांची पारंपारिक वाद्यांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. निलेश बेत्ती हे या गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष असून अभिषेक तांबोळी(बबलू) आणि शुभम कोंडीलकर हे सचिव म्हणून जबाबदारी पाहत आहेत. तर मंडळाच्या तिजोरीच्या चाव्या अत्यंत प्रामाणिक समजले जाणारे निखिल फडतरे यांच्या स्वाधीन असतात.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image
फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा -एंजेल वनचे आवाहन
Image