ताम्हिणी घाटात कार २०० फुट कथड्यावरुन खाली कोसळली ३प्रवासी ठार ,३जखमी कोंडेथर गावाजवळील घटना

ताम्हिणी घाटात कार २०० फुट कथड्यावरुन खाली कोसळली ३प्रवासी ठार ,३जखमी कोंडेथर गावाजवळील घटना


माणगाव (प्रतिनिधी)  -माणगावपासून सुमारे३५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या माणगाव -पुणे रसत्यावरील ताम्हिणी घाटात  स्विफ्ट डिझायर कारला भिषण अपघात होऊन कार २०० फुट कठड्यावरुन खाली दरीत कोसळली.या अपघातात कारमधील ३ प्रवासी जागीच ठार झाले असुन ३ प्रवासी गंभीर जखमी होऊन कारचा चुराडा  झाला आहे.सदरचा अपघात शनिवार दि.१९ आँगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला.

        सदर अपघाताबाबत अधिक व्रत्त असे की वाशीम जिल्हा अकोला येथुन आलेल्या स्विफ्ट कारमध्ये एकुण ६ प्रवासी होते.ते कोकणात पर्यटनासाठी आले होते. ते पुन्हा आपल्या गावी वाशीमला परत जात असताना त्यांची गाडी ताम्हिणी घाटात आली असताना वळणावर त्यांची कार  २०० फुट कठड्यावरुन खाली दरीत  कोसळली.या अपघाटाची माहिती समजताच माणगाव पोलिसांसह साळुंखे रेस्क्यू टिम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला. कारमध्ये मयत झालेले ३ प्रवासी व जखमी ३ प्रवासी अडकून पडले होते त्यांना पोलिसांनी,साळुंखे रेस्क्यू टिमनी बाहेर काढले. मयतांना व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे,क्रष्णा राठोड यांचा जागीच म्रुत्यु झाला.तर 

रोहन गाडे,प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण हे ३ जण जखमी झाले.जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Popular posts
२२ एप्रिल रोजी शेलघर येथे काँग्रेसची आढावा बैठक.;सर्वच पदाधिकाऱ्यांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन
Image
रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनचे खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सेंटरचे उदघाटन
Image
दिल्ली दरबारी महेंद्रशेठ घरत यांची तोफ धडाडली-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महेंद्रशेठ घरत यांचे केले कौतुक
Image
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडेंचा जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी जाहीर सत्कार
Image
कु.देवश्री प्रशांत शेडगे हिचा विदेशात डंका; कॉम्प्युटर क्राऊड मद्धे मास्टर करून पनवेल च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
Image