स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिडकोमध्ये पदयात्रा आणि वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिडकोमध्ये पदयात्रा आणि वृक्षारोपण कार्यक्रम साजरा   



नवी मुंबई(प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको महामंडळामध्ये  13 ऑगस्ट 2022 रोजी पदयात्रा आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांवेळी श्री. एस. एस. पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र देशभर मोठ्या उत्साहाने साजरा होत असून यानिमित्त घरोघरी तिरंगा अभियानासह अनेक विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको महामंडळातही डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निबंध व कविता लेखन स्पर्धा, पदयात्रा, फुटबॉल सामना, देशभक्तीपर गीते इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सिडकोचे मुख्यालय असलेल्या सिडको भवन ते रायगड भवन दरम्यान सकाळी 09.00 वाजता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी 10.00 वाजता रायगड भवनसमोरील मैदानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच संध्याकाळी 05.00 वाजता सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याचेही आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला.  

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image