आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न



अलिबाग,दि.25 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (दि.23 ऑगस्ट ) रोजी  पी.एन.पी.कॉलेज अलिबाग येथे  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.सुहास माने व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांचे नियोजन व प्राचार्य डॉ.ओमकार पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

      यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी एड्सविषयी मार्गदर्शन करताना एचआयव्ही म्हणजे काय, एड्स म्हणजे काय त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती दिली. तसेच एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येत असलेल्या एआरटी औषधोपचार तसेच प्रत्यकाने लैंगिक संबंधाविषयी नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत,असेही सांगितले. त्यामध्ये लग्नापूर्वी ब्रम्हचर्य पाळा, लग्नानंतर श्रीराम बना तसेच हा रोग पूर्णपणे बरा होईल असे कोणतेही औषधोपचार उपलब्ध  नसल्यामुळे एचआयव्ही/ एड्स विषयी माहिती घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचे सांगून यावेळी युवकांच्या करिअरविषयी मार्गदर्शन केले.  

     या आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत हर घर तिरंगा  आणि एचआयव्ही/ एड्स या विषयावर Face Painting  स्पर्धा व Face  Reel  बनविणे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याकरिता आवाहनही करण्यात आले.

     या दोन्ही स्पर्धेकरिता अनुक्रमे प्रथम क्रमांक 500/-, द्वितीय क्रमांक 350/- व तृतीय क्रमांक 250/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा.रविंद्र पाटील  यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्व व उद्देश स्पष्ट केला तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू सांगितला.  

       या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र पाटील, प्रा.पल्लवी पाटील, जिल्हा सहायक लेखा  श्री.रविंद्र कदम, पी.एन.पी. कॉलेज, शिक्षक प्रा.नितीश अगरवाल, प्रा.दिनेश पाटील, प्रा.विक्रांत वार्डे, जिल्हा रुग्णालयातील आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनवणे, समुपदेशक कल्पना गाडे, टी.बी. विभागाचे कीर्तिकांत पाटील, श्रीम.माधुरी पाटील, एचएलएलचे श्रीम.जुईली पाटील, एनजीओ प्रतिनिधी श्रीम. करुणा म्हात्रे, महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts
मोटारसायकल चोरी व जबरी चोरी करणार्‍या सराईत आरोपींना खांदेश्‍वर पोलिसांनी केले जेरबंद
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
‘आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा’ ; २३ जूनपासून होणार भव्य सुरुवात
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गुळसुंदे येथे वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम
Image
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर द्यावे सर्वपक्षीय कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी; सकारात्मक प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’चे नाव विमानतळाला मिळावे यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास येत असून आगामी काळात हे विमानतळ कार्यान्वित होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे मंत्री गणेश नाईक यांच्यासह समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, खजिनदार जे.डी. तांडेल, कार्यकारिणी सदस्य अतुल पाटील, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ‘दिबां’च्या नावासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न व पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले
Image