नाशिक जिल्ह्यामधील जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा सुधागड व तळा तालुक्यातील स्वप्नातील गावांचा अभ्यास दौरा ४ व ५ ऑगस्ट रोजी संपन्न...!
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वदेस फाउंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यामध्ये ७५ स्वप्नातील गावे पोलादपूर, महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड या तालुक्यांमध्ये ग्रामविकास समितीच्या पुढाकाराने तयार करण्यात येत आहेत .
नासिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेसी यांच्या संकल्पनेमधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त इगतपुरी ,त्र्यंबकेश्वर पेठ व सुरगाणा तालुक्यामधील २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुधागड तालुक्यामधील कवेलेवाडी व भाऊशेत ठाकूर व तळा तालुक्यातील वावे हवेली या स्वप्नातील गावांना भेट देऊन तेथे स्वदेस फाउंडेशन, गाव विकास समिती व शासन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या कामांचा अभ्यास केला.
गावांमध्ये स्वच्छ ,सुंदर , स्वस्थ, साक्षर व स्वावलंबी या घटकांवर आधारित ६३ प्रकारची कामे करण्यात येत आहेत याविषयी गाव विकास समिती यांच्याकडून माहिती घेऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली,तसेच सुधागड तालुक्यातील भाऊशेत ठाकूरवाडी व तळा तालुक्यातील वावे हवेली या स्वप्नातील गावांचे उद्घाटन केले
सुधागड तालुक्यामधील कार्यक्रमांमध्ये तहसीलदार दिलीप रायन्नवार, गटविकास अधिकारी विजय यादव, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक महामुनी व पोलीस निरीक्षक विश्वजित कांईगडे उपस्थित होते.
वावी हवेली येथील कार्यक्रमांमध्ये महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, सरपंच, ग्रामसेवक गाव विकास समितीचे सदस्य व ग्रामस्थ सहभागी होते
जिल्हा परिषद नाशिक च्या अभ्यास दौऱ्यामध्ये डॉ.लता गायकवाड गट विकास अधिकारी इगतपुरी, श्रीकीसन खातळे गट विकास अधिकारी त्रंबकेश्ववर, भरत वेन्दे सहायक गट विकास अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नाशिक, संजय पवार, रामचंद्र झिरवाळ, बाळू पवार , बापू सादवे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत, श्री योगेश बोराडे कनिष्ठ सहायक, श्री संदीप वसावे, हनुमान दराडे, श्रीमती रुपाली जाधव, ज्ञानेश्वर पाचोरे, श्री सुरेश पखाने, श्रीमती सुनीता कडवा, श्री गौतम चव्हान, श्री गोरख ढहाळे, श्रीमती मोहिनी दळवी, श्री स्वप्नील पाटील, श्री मोहन गायकवाड, श्री मुरलीधर धूम, व मनोहर धूम ग्रामसेवक या सर्वांनी स्वप्नातील गावे पाहून ग्राम विकास समितीच्या मार्फत स्वदेस फाउंडेशन च्या मदतीने सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले व रायगड जिल्हा प्रमाणेच नाशिक जिल्ह्यामध्ये स्वप्नातील गाव तयार करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले, या दौऱ्यामध्ये स्वदेस फाउंडेशन नाशिक येथील व्यवस्थापक मनोज आहिरे योगेश तोत्रे, संदीप देवमोरे, दीपक गिऱ्हे व गणेश थोरात सहभागी होते
कवेलेवाडी भाऊशेत ठाकूर व वावे हवेली या स्वप्नातील गावांमधील गाव विकास समिती मधील सदस्य व स्वदेस व्यवस्थापक शिवदास वायल, समीर शेख, रवींद्र राऊत व संदीप देवमोरे यांनी हा दौरा यशस्वी करण्यासाठी खूपच मेहनत घेतली