श्रावणातील रानभाज्या पनवेलकरांच्या भेटीला*, "प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने रान-भाजी महोत्सव २०२२" संपन्न

श्रावणातील रानभाज्या पनवेलकरांच्या भेटीला*, "प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने रान-भाजी महोत्सव २०२२" संपन्न 



पनवेल : "एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे" आयोजन जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि ट्रायबल ग्रीन यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या डोंगर दऱ्यामधील रानभाज्या या उपयुक्त असतात. परंतु त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात करण्यात आली. यावेळी रानभाजी कशी करावी त्याची पद्धत सांगण्यासाठी  आदिवासी भगिनींना आम्ही फूड स्टॉल उपलब्ध करून दिला होता ज्यामध्ये भाजी बनवून ती भाकरी सोबत उपस्थित सर्वांना खाण्यासाठी उपलब्ध होती.
     या महोत्सवात 15 पेक्षा जास्त भाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला पनवेल आणि उरण मधील नागरिकांनी  भेट दिली. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पनवेल अर्बन बँकेचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. तसेच 3500 पेक्षा जास्त भाज्यांच्या जुडयांची विक्री झाली, त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना रोजगाराची नवीन संधी एक निर्माण करण्यास आपल्या पनवेलकरांचा हातभार लागला याचे समाधान वाटले.
    या महोत्सवाला तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामध्येही डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या च्या फार्मासिटिकल च्या विद्यार्थ्यांनी या भाज्या कुठे आणि कशा प्रकारे उगवतात, त्यांचे कोणते गुणधर्म असतात इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी या उपक्रमाला भेट देऊन माहिती घेतली याचे समाधान वाटले.
       या कार्यक्रमासाठी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांच्यासोबतच ट्रायबल ग्रीनचे फाउंडर सुनेत्रा अरुण पालव, राजेंद्र सरोज,  जफर पिरझाडा,  चंचला बनकर, पंढरी शेट्टी,  किरण वर्मा, डॉ. केरीन तेरी, दोन्ही संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच पनवेल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image