अलिबाग येथे कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव संपन्न

 अलिबाग येथे कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव संपन्न


     *अलिबाग, दि.14 (जिमाका):-* महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार श्रीमती मीनल दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मौजे वडगाव, सागाव, वाघजाई, कामतवाडी येथील आदिवासी महिला व शेतकरी बांधवांनी करटोली, बांबू, शेवगाचे पाने, चिवई, हादगा, आळू, दिंडा, अंबाडी, टाकळा, भारंगी, कावळा, घोळभाजी, कुर्डू, पाथरी, गुळवेल, सुरण, माड, हेलंड, अंबर्वेल इत्यादी रानभाज्या प्रदर्शन व विक्रीस ठेवल्या होत्या.

     हा कार्यक्रम अलिबाग बस स्थानकाच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रकल्प संचालक आत्मा श्री.संतोष बोराडे, जिल्हा परिषद जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कैलास वानखेडे, अलिबाग तालुका कृषी अधिकारी श्रीमती हर्षाली सावंत तसेच मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक उपस्थित होते.



Popular posts
ए तो झाकी है : महेंद्रशेठ घरत;उरणमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Image
महेंद्रशेठ घरत यांनी साताऱ्यात तीन पिढ्यांशी साधला संवाद! महेंद्रशेठ घरत यांची लोखंडे बाईंना साताऱ्यातील वाठार येथे आदरांजली
Image
लोकशाही पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी शंकर वायदंडे यांची निवड-सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या शुभेच्छा.....!!
Image
उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर विजयी.
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर शाळेचा वृद्धाश्रम व आदिवासी आश्रम शाळेला भेटीचा उपक्रम
Image