"हरी मशीद "ट्रस्ट मक्तबे रहीमीया तर्फे देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

"हरी मशीद "ट्रस्ट मक्तबे रहीमीया तर्फे देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा 


पनवेल(प्रतिनिधी)-देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन ओवे गाव मधील सेक्टर ३० मधील  "हरी मशीद "ट्रस्ट मक्तबे रहीमीया तर्फे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मशीदीचे इमाम मौलाना नदीम बुबेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हा महोत्सव ट्रस्टचे सेकेटरी मन्सूर अ.रहीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष निसार पटेल, मुदस्सिर पटेल, अॅड. इर्शाद शेख आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी ओवे उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली व देशभक्तिची घोषणा केली.

       हरी मशीदीच्या आवारात मन्सूर पटेल यांनी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करून व्याख्यानाद्वारे सर्व भारतीयांना देशभक्ति व बंधुभावाचा संदेश देण्यात आला. 

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैय्यद इस्माईल सर यांनी केले.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image