पनवेल(प्रतिनिधी)- लोकनेते रामशेठठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठठाकूरपब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ पटकाविला त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबई मधील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे यांनी आज या विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच शिक्षक वर्गाचे भरभरून कौतुक केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या पुणे विभागाचे सहाय्यक अधिकारी शंकर पवार, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, रायगड विभाग पीआरओ बाळासाहेब कारंडे, रामशेठठाकूरपब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, वास्तुविशारद श्री. पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे तसेच इतर मान्यवरांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ व लोकनेता पुस्तक देऊन स्वागत सत्कार केले.