दहिहंडी सण साजरा करताना नियमाचे पालन महत्वाचे - पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल, शिवराज पाटील

दहिहंडी सण साजरा करताना  नियमाचे पालन महत्वाचे - पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल,  शिवराज पाटील 


पनवेल, दि.17 ( संजय कदम ) : दहिहंडी सण साजरा करताना  नियमाचे पालन करणे  महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल  शिवराज पाटील यांनी आज घेतलेल्या सार्वजनिक दहिहंडी आयोजक बैठकीत केले .                                 दहिहंडी सणानिमीत्ताने सार्वजनिक दहिहंडीचे आयोजक यांची पोलीस ठाणे मंथन हॉल येथे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल  शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली . या बैठकीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर , गोपनीय विभागाचे अंमलदार सचिन होळकर यांच्यासह हद्दीतील दहीहंडी आयोजक, पोलीस पाटील आदी उपस्थित होते . यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले की, दहिहंडी उत्सवामध्ये सामील होणा-या गोविंदाचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे, गोविंदा सशक्त व ताकतवान जवान असावे, दहिहंडी ठिकाणी जनरेटर, फायर फायटर, रूग्णवाहिका व गोविंदा पथकाचा विमा उतरविण्यात यावा, ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा विहीत डेसीबल पेक्षा जास्त नसावी, डीजे/डाॅल्बी किंवा इतर कर्कश आवाजाची उपकरणे वापरू नये, तसेच शासनाकडून आलेल्या परिपत्रानुसार दहिहंडी व गणेशोत्सव सणाबाबत  मार्गदर्शन करून त्यांनी आवश्यक त्या सुचना दिल्या.  सदर बैठकीस दहीहंडी मंडळाचे एकूण 51 पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दहीहंडी मंडळातील आयोजकांना शांतता राखणे कामी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना फौजदारी प्रक्रिया 149 प्रमाणे नोटीस अदा करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी दिली . 

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image