पनवेल मनपा आयुक्त आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना धोकादायक झाडांची छाटणी करण्याबाबत खारघर भाजपा अध्यक्ष ब्रीजेश पटेल यांचे निवेदन

पनवेल मनपा आयुक्त आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना धोकादायक झाडांची छाटणी करण्याबाबत खारघर भाजपा अध्यक्ष ब्रीजेश पटेल यांचे निवेदन


खारघर (प्रतिनिधी)- खारघर शहराच्या सभोवताली असणाऱ्या डोंगररांगा आणि एका बाजूस असलेल्या समुद्रामुळे पावसाचे प्रमाण खूप अधिक असते.बहुतेक सेक्टर्समध्ये जुने मोठ मोठाले वृक्ष रस्त्याच्या कडेला तसेच इमारतींच्या आजूबाजूला लावण्यात आले आहेत.ही झाडे मोठी असली तरी त्यांची मुळे खोलवर गेलेली नाहित. 
         पावसाळ्यात वाऱ्याच्या गतीने तसेच खालील माती भुसभुशीत झाल्याने अनेक वृक्ष उन्मळून पडतात.त्यांनी आजपर्यंत शहरात जीवितहानी झाली नसली तरी खाली उभ्या केलेल्या गाड्यांचे किंवा इतर मालमत्तेचे नुकसान झालेले आहे होत आहे.या वर्षापासून सिडकोने ही झाडे छाटण्याचे काम बंद केलेले आहे.त्यामुळे कदाचित यावर्षी झाडे पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसांत अशा चार ते पाच घटना घडल्याचे
 विचारात घेता खारघर शहर अध्यक्ष श्री.ब्रिजेश पटेल व उपाध्यक्ष श्री.दिलिप जाधव यांनी सभागृह नेते मा.श्री.परेशजी ठाकूर व मा.आयुक्त श्री.गणेश देशमुख यांना खारघरवासियां तर्फे शहरनिहाय वृक्ष तोडणी पथके स्थापन करुन धोकादायक झाडांची छाटणी तातडीने करण्याबाबतचे निवेदन दिले आहे.
        मा.परेशजी ठाकूर साहेबांनी सदर बाबतची गंभिरता लक्षात घेत महापालिकेच्या
 वृक्ष छाटणी पथकात अधिक मनुष्यबळ वाढवून धोकादायक वृक्षाची छाटणी तातडीने करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या आहेत.
Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image