सौ.वैभवी बांदकर यांना *राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्राप्त
डोंबिवली (प्रतिनिधी)- "अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद" मुंबई प्रदेश, ठाणे जिल्हा विभाग आयोजित 2 रे पी सावळाराम राज्यस्तरीय साहित्य संमेलन आज दिनांक २४ जुलै २०२२ रोजी डोंबिवलीच्या सांस्कृतिक नगरीत शुभम बॅंक्विट हॉल येथे पार पडले या. भव्य दिव्य संमेलनामध्ये डोंबिवली येथीलसौ.वैभवी कमलेश बांदकर (योग्यं वास्तू🧭)यांना "पी सावळाराम राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार" मिळाला आहे. (सौ.वैभवी कमलेश बांदकर या वास्तुविशारद, रेकी मास्टर, जेमोलॉजिस्ट, टॅरोकार्ड रिडर आहेत गेले 12 वर्ष यशस्वीरित्या या क्षेत्रात काम करत आहेत) हा पुरस्कार संमेलनाच्या अध्यक्षा सौ.राजश्री बोहरा आणि श्री शरद मधुकर गोरे (संस्थापक) यांच्या शुभहस्ते देण्यात आला.या क्षणी वैभवी बांदकर म्हणाल्या आज मला झालेला आनंद हा गगनात देखील मावणार नाही एवढा आहे माझ्या कामाची समाजाने दखल घेतली आणि त्यांचे प्रेम मला एका मानचिन्हामधून मिळाले असे वाटतं आहे. पुरस्कार मिळाल्याने आता मला माझे काम अजून जोमाने आणि उत्कृष्टप्रकारे करण्यासाठी एक वेगळीच प्रेरणादायी ताकद मिळाल्या सारखे वाटतं आहे.यासाठी त्यांनी आपल्या पतीचे श्री. कमलेश बांदकर आणि योग्यं वास्तुच्या परिवाराचे विशेष आभार मानले.
संस्थेचे वरिष्ठ अधिकारी व ठाणे जिल्हा, तसेच कल्याण डोंबिवली महानगर विभाग कार्यकारिणी या सर्वांचा समावेश या संमेलनात होता.