सीकेटी विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे श्रध्दास्थान स्वर्गीय चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यतिथी निमित्त नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, सचिव डॉक्टर एस. टी. गडदे, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, माजी प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, सुशीला घरत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, शाळा समिती सदस्य जे. वाय बावडे, बी. एस. भोईर, छायाताई ठाकूर, हरचंद्रसिंग सग्गू, जयराम मुंबईकर, चांगू काना ठाकूर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक कैलास मंत्रे, संतोष चव्हाण, अजित सोनावणे, प्रशांत मोरे, अनुराधा कोल्हे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्याचा पारितोषिक रक्कम व सन्मान चिन्ह देवून विशेष गुणगौरव करण्यात आला. या उपस्थित मान्यवरांनी चांगू काना ठाकूर साहेबांच्या स्मृतींना उजाला दिला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.