जिल्ह्यात स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागातील इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करावेत


जिल्ह्यात स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागातील इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर करावेत


अलिबाग, दि.20 (जिमाका):- जिल्ह्यामध्ये स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे व इतर अनुषंगिक कामकाजासाठी भूमी अभिलेख विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा आवश्यक आहेत.

     रायगड जिल्ह्यामध्ये स्वामित्व (गावठाण जमाबंदी प्रकल्प) योजनेंतर्गत भूमी अभिलेख विभागातील इच्छुक असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, रायगड-अलिबाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, हिराकोट तलावाजवळ, अलिबाग-402201 येथे सादर करावेत.

     या योजनेंतर्गत काम करण्यास इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी चालू नसावी, तसेच त्यांचे वय 65 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे.

     संबंधिताच्या सेवा शासनाकडील वेळोवेळी पारित केलेल्या प्रचलित शासन निर्णय/अटी शर्तीची पूर्तता केल्यानंतर घेण्यात येतील व ही प्रक्रिया कधीही, कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना असेल, असे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी कळविले आहे.



Popular posts
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मंचच्यावतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
Image