श्रीजी होर्डींग कंपनीची मनमानी;पनवेलमधील हायवेवरील पुलाला होर्डींगची अवजड फ्रेम,जिवितहानीचा मोठा धोका- प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष्य

श्रीजी होर्डींग कंपनीची मनमानी;पनवेलमधील हायवेवरील पुलाला होर्डींगची अवजड फ्रेम,जिवितहानीचा मोठा धोका- प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष्य 



पनवेल(प्रतिनिधी)-पनवेल महानगरपालिका क्षेत्रात श्रीजी या होर्डींग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने होर्डींगचे मोठमोठे स्ट्रक्चर उभारण्याचा सपाटाच लावला आहे.यावरती कहर म्हणजे खांदा काॕलनी उड्डाणपुलाच्या आणि पनवेल शहरातील निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाच्या साईड कट्ट्यावरती अवाढव्य असे अवजड होर्डींग लावले असून,हे लावताना पुलाच्या कट्ट्याला खूप मोठे आणि असंख्य ठीकाणी ड्रील मारून साईड कट्टा कमकुवत केला आहे.पुलाखालून  २४ तास वाहतूक चालू असते.अशा परिस्थितीत हे कमकुवत झालेले पुलाचे रेलींग वरील अवजड वाहनांच्या हादऱ्याने पडले तर पुलाखालून होणाऱ्या वाहनातील लोकांचे जीव जातील.त्याला जबाबदार कोण ?काही ठीकाणच्या होर्डींगना शासनाच्या कोणत्याही परवानग्या प्राप्त नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

      श्रीजी कंपनीचे सुपरवायझर प्रविण सावंत यांच्याकडे याबाबतीत विचारणा केली असता,त्यांनी सांगीतले की,वरिष्ठांनी दीलेली जबाबदारी पार पाडणे हेच माझे कर्तव्य आहे. 

       एम.एस.आर.डी.सी.कडे या पूलाचे स्ट्रक्चरल आॕडीट करण्याची लेखी मागणी मी स्वतः करणार असल्याचे आप्पासाहेब मगर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.पनवेल महानगरपालिच्या उपायुक्तांना दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,तो होऊ शकला नाही.

Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image