महाड तालुक्यातील बावळे गावपरिसरातील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांनी केली पाहणी

 

महाड तालुक्यातील बावळे गावपरिसरातील जमिनीला पडलेल्या भेगेची भूवैज्ञानिकांनी केली पाहणी

*प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती* 



     *अलिबाग, दि.05 (जिमाका):-* रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे येथील परिसरात भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.राजेश मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी या गावपरिसराला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगेची तातडीने पाहणी केली.

     महाड तालुक्यातील बावळे या गावपरिसरातील जमिनीला पडलेली ही भेग उत्तर-दक्षिण असून त्याची लांबी सुमारे 15 ते 20 मीटर एवढी आहे. या भेगेची खोली दीड ते दोन फूट असून त्यात पाणी साठलेले आहे. या बाबीवरून ही भेग मातीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पडलेली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तथापि या भेगेबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे यांना कळविण्यात आले आहे.

     प्राथमिक पाहणी दरम्यान या भेगांमुळे कोणताही धोका संभवत नसून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या भेगेची दररोज दोन ते तीन वेळा पाहणी करून काही बदल असल्यास स्थानिक प्रशासनास त्वरित कळविण्याबाबत संबंधित सरपंच व गावकऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.


Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image