आर्शिया कंपनीवर साई ग्रामपंचायतीकडून जप्तीची नोटीस
.............................. ................
साई ग्रामपंचायतीची आर्शियाकडे 8,75,49,418 थकबाकी
.............................. ...............
25% रक्कम दि.28 जून 2022 रोजी भरा, मा. उच्च न्यायालयाचे आदेश
नवीन पनवेल(रत्नाकर पाटील): पनवेल तालुक्यातील साई येथे आर्शिया फ्री ट्रेड वेअरहौसिंग झोन कंपनी कार्यरत आहे. सदर कंपनीने आजतागायत ग्रामपंचायतीचा कर न भरल्याने ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बबन अंबादास राठोड आणि सरपंच अमृता सुनील तांडेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कंपनी प्रशासनास दि.29 ऑक्टोबर 2021 रोजी रिट नोटीस बजावली होती, या नोटीसीला कंपनी प्रशासनाने आवाहन देत ग्रामपंचायतीच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊन अंतरिम आदेश व जप्तीला स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती. अखेर यावर दि.24 जुन, 2022 रोजी सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालयाने निर्णय देत कंपनी प्रशासनास सन 2021-22 पर्यंतची एकूण थकबाकी 8,75,49,418 च्या 25% रक्कम दि.28 जुन,2022 रोजी ग्रामपंचायतीला जमा करण्याचे आदेश दिले होते. तरीही आजवर देय रक्कम कंपनी प्रशासनाकडून मिळाली नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि.8 जुलै,2022 रोजी आर्शिया कंपनीवर सकाळी ठीक 11.00 वाजता ग्रामपंचायत जप्तीची कारवाई करणार आहे, असे ग्रामपंचायतीने संयुक्तरित्या काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.