श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने नेरे भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने नेरे भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप



पनवेल(प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने पनवेल तालुक्यातील नेरे भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.  मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या नेहमीच मदतीचा हात देण्यात येतो. त्याअंतर्गत मंगळवारी नेरे विभागात वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
       या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, डॉ. रोशन पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, स्कुल कमिटी अध्यक्ष काका गवते, माजी सरपंच वासुदेव गवते, माजी सरपंच जयंत मानकामे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घाडगे, माजी सदस्या सुवर्णा मगर, कविता गवते, युवानेते राम पाटील, सुभाष पाटील, मेघनाथ पाटील, संजय बाळू पाटील, दत्ता पाटील, माजी सदस्य हेमंत मानकामे, माजी सदस्य गोटिराम म्हात्रे, अनंता पाटील, किशोर खारके, युवा मोर्चाचे सागर पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आयुष्यामध्ये मध्ये प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसून शिक्षणाला महत्व द्या, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
Popular posts
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
*शासनाच्या अधिकृत बातम्यांसाठी सोशल मीडियाच्या विविध अकाऊंटस् ना भेट देण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*
पनवेलमध्ये 'दिवाळी पहाट'ने सजली दीपावली; राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वराची बरसात
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image