जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन


*नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना तसेच अनुषंगिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन*

 

अलिबाग, दि.5 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्‍ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

      या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसिल कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती पुढीलप्रमाणे.

       तहसिल कार्यालय, अलिबाग- 02141-222054, भ्रमणध्वनी- 8275278218, तहसिल कार्यालय, पेण-   02143 - 252036, भ्रमणध्वनी-8459482937, तहसिल कार्यालय, मुरुड - 02144- 274026, भ्रमणध्वनी- 7020573620, तहसिल कार्यालय, पनवेल - 022 - 27452399, भ्रमणध्वनी- 8369899902, तहसिल कार्यालय, उरण - 022-27222352 भ्रमणध्वनी - 9892538409, तहसिल कार्यालय, कर्जत - 02148 - 222037 भ्रमणध्वनी- 9373922909, तहसिल कार्यालय, खालापूर- 02192 - 275048, भ्रमणध्वनी - 8262898788, तहसिल कार्यालय, तळा - 02140-269317, भ्रमणध्वनी - 7066069317, तहसिल कार्यालय, माणगाव- 02140 - 262632 भ्रमणध्वनी - 7498191244, तहसिल कार्यालय, रोहा - 02194 - 233222, भ्रमणध्वनी - 9022970394, तहसिल कार्यालय, सुधागड - 02142-242665, भ्रमणध्वनी - 8830333747, तहसिल कार्यालय, श्रीवर्धन - 02147 - 222226, भ्रमणध्वनी - 9284730753 / 7249579158, तहसिल कार्यालय, म्हसळा - 02149 - 232224, भ्रमणध्वनी- 8459795326, तहसिल कार्यालय, महाड - 02145 - 222142 / 223783, भ्रमणध्वनी- 8263086355, तहसिल कार्यालय, पोलादपूर - 02191-240026, भ्रमणध्वनी - 8999067510.

        तरी प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णतः सज्ज असून जिल्ह्यातील नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.


Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image