श्री क्षेत्र पंचायतन मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी,"जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा पुढाकार""
पनवेल : गुरुपौर्णिमे निमित्त जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर परिसरातील श्री साई मंदिरात सकाळी संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी कुटुंबासमवेत दुग्धाअभिषेक करून गुरुपौर्णिमेची सुरुवात केली. यावेळी पनवेल मधील "प्रगती महिला भजन मंडळ घाटे आळी,पनवेल" आणि "श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ, गव्हाण-कोपर" यांच्या माध्यमातून सुश्राव्य भजनसंगीत कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते . मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पनवेलचे आदर्श नगराध्यक्ष श्री. जे.एम.म्हात्रे साहेबांच्या संकल्पने नुसार मंदिर परिसरातून आपण आरोग्य सेवा सुद्धा वेळोवेळी भाविकांना द्यावी , त्यांच्याच प्रेरणेतून आरोग्यसेवा शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये शेकडो भाविकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.