गुरुपौर्णिमा भेट
महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, निरूपण व सामाजिक क्षेत्रात अलौकिक कार्य करणारे थोर निरुपणकार तीर्थरूप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची गुरुपौर्णिमेनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी आज रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले. यावेळी रायगड भूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, तसेच उरण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन पाटील उपस्थित होते.