पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर विंधण विहिरींच्या कामांना मंजुरी मिळेना

पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर विंध विहिरींच्या कामांना मंजुरी मिळेना


नवीन पनवेल (मयूर तांबडे) : पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, असे असले तरी देखील विंध विहिरींच्या कामांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे शासनाचे आदिवासी भागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

             गाढेश्वर धरण बाजूला असून देखील या धरणाचे पाणी आदिवासी वाड्यांना प्यायला मिळत नाही. त्यामुळे धरण उशालाकोरड घशाला अशी परिस्थिती आदिवासी पाड्यांवरील नागरिकांची झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाई सदृश्य वाड्यांवर विंधण विहीर मारण्यासाठीचा प्रस्ताव अलिबाग येथे पाठवला आहे. मात्र तो प्रस्ताव लालफितीत अडकला असल्याचे समोर आले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू होत आला तरीदेखल विंधण विहिरींच्या कामांना मंजुरी मिळत नाही.

त्यामुळे यातून नक्की काय साध्य करायचे आहे असा सवाल उपस्थित होत आहे. पाणी टंचाई असलेल्या गावात किंवा वाडीवरील पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी विंध विहीर मारली जाते. मात्र जून महिन्याचे पंधरा दिवस संपत आले तरी देखील विंधण विहिरीची कामे मंजूर झालेली नसल्याने पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली  आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे.

             2021 मध्ये देखील पनवेल तालुक्यातील 10 वाडे आणि ८ वाड्यांचा विंधण विहिरींचा प्रस्तावित आराखडा अलिबाग येथे पाठवण्यात आला होता. मात्र केवळ पोयंजे- ठाकूरवाडी याठिकाणी विंधण विहिरीला मंजुरी मिळाली होती. मात्र या ठिकाणी देखील विंधण विहीर खोदण्यात आलेली नसल्याची माहिती पनवेल पंचायत समिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. 2022 मध्ये तुराडे-ठाकूरवाडीपोयंजे- आदिवासीवाडीचेरवली -आदिवासीवाडीसांगटोली-आदिवासीवाडीनानोशी कामठवाडीसांगूरली फणसवाडीनांदगाव -आदिवासी वाडीमालडुंगे-वाघाचीवाडीवावंजे- भेंडीची वाडीकानपोली-हेदुटणेपाली-कातकरवाडीबकुळवाडी या आदिवासी वाड्यांवर विंधण विहिरी मारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जून महिना उजाडून अर्धा महिना संपत आला तरी विंधण विहिरी मंजूर होत नसल्याने विंधण विहिरीचा विषय फक्त दिखावा असल्याचे स्पष्ट होत आहे.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image