आषाढी एकादशी निमित्त उरण ते पंढरपूर दिंडी

 आषाढी एकादशी निमित्त उरण ते पंढरपूर दिंडी 


उरण दि 22(विठ्ठल ममताबादे ) श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी मंडळ नवीन शेवा उरण जिल्हा रायगड, ओम साई भक्त भजन मंडळ नवीन शेवा,श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला मंडळ नवीन शेवा,श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला मंडळ माळाकोळी नांदेड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्यासाठी उरण मधून दिंडी निघाली असून उरण मधून श्री क्षेत्र पंढरपूर ला जाणारी ही पहिलीच दिंडी आहे.

मंगळवार दिनांक 21 /6/ 2022 रोजी उरण मधून पायी यात्रा दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. सदर दिंडीत हरिभक्त परायण गुरुवर्य (सर्व) देवजी महाराज बाबर, गोविंद महाराज घरत, नितीन महाराज म्हात्रे, महेश महाराज साळुंखे, राजेंद्र महाराज ढाकणे, श्रीरंग महाराज तिडके, सरस्वती ताई केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झाली आहे.

 कीर्तन,प्रवचन,हरिपाठ, भारुड, पोती वाचन,भजन,धार्मिक व सामाजिक कार्यक्रम असे दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप आहे. दिनांक 19/6/2022  रोजी श्री बारा ज्योतिर्लिंग देवस्थान माळाकोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथून दिंडी सर्वप्रथम प्रस्थान  झाली. पुढे दिनांक 20/6/2022 रोजी जीवनमुक्त स्वामी मठ, नागाव उरण जिल्हा रायगड दिंडी पोहोचली.येथे मठामध्ये महाआरती करण्यात आली.रात्री नवीन शेवा येथे दिंडीची मुक्काम झाली. सदर 20 दिवसाचे हे दिंडी वारी असून मंगळवार दिनांक 21/6/2022 रोजी ही वारी श्री क्षेत्र आळंदी येथे दुपारी 3 वाजता पोहोचणार आहे. शनिवार दिनांक 9/7/2022 रोजी क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी पोहोचणार आहे. उरण मधून प्रथमच श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाण्यासाठी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प राजेंद्र महाराज केंद्रे यांनी दिली. ज्यांना कोणाला अन्नदान करायचे आहे किंवा आर्थिक मदत वस्तू स्वरूपात करावयाचे आहे त्यांनी राजेंद्र महाराज केंद्रे(फोन नंबर 87795 56511) अथवा मंडळातील कोणत्याही सदस्याकडे संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image