१०जूनला येणारा मराठी चित्रपट "मजनू",कालच या चित्रपटाची टीम पनवेलकराच्या भेटीला येवून गेली

१०जूनला येणारा मराठी चित्रपट "मजनू",कालच या चित्रपटाची टीम पनवेलकराच्या  भेटीला येवून गेली



पनवेल (प्रतिनिधी)- "मजनू" या मराठी चित्रपटाचे सह- निर्माते इरफान मेहबूबअली भोपाळी यांनी पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी मराठी चित्रपट 'मजनू' येत असल्याचे सांगून चित्रपटाविषयी माहिती दिली. यावेळी 'मजनु' चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे निर्माते गोवर्धन दोलताडे, चित्रपटातील अभिनेता रोहन पाटील अभिनेत्री स्वेतलाना अहिरे  यांच्या उपस्थितीत या चित्रपटा बाबत माहिती देण्यात आली असून या चित्रपटात अभिनेते "लागिर झालं जी" या टीव्ही वाहिनी वरील 'आज्या' म्हणजे नितेश चव्हाण मुख्य भिमिकेत असून अभिनेत्री स्वेतलाना अहिरे ही कस्तुरीच्या भुमिकेत असून सुरेश विश्वकर्मा, मिलिंद शिंदे ,अरबाज शेख, प्रणव रावराणे ,आदिती सारंगधर,माधवी जुवेकर ,भक्ती चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून  हा चित्रपट प्रेम कथा नसून समाजासाठी नवीन सु-संदेश देणारा चित्रपट असल्याने कुटुंबातील सर्व  व्यक्तींनी एकत्र बसून पाहण्यासारखा  आहे अशी माहिती शिवाजी दोलताडे सह निर्माते  इरफान भोपाळी यांनी दिली.  लवकरच जवळच्या चित्रपटगृहात  प्रेक्षकांनी पाहावे असे आवाहन या पत्रकार परिषदेत  करण्यात आले.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image